राज्यात दोन हजार गावात काम तेवढीच मशिनरी केली उपलब्ध

0

बळसाणे । भारतीय जैन संघटना आणि पाणी फाऊंडेशन यांच्यामार्फत राज्यातील चोवीस जिल्ह्यातून पंच्याहत्तर तालुक्यातील सोळाशे गावांमध्ये श्रमदान आणि यंत्राच्या साहाय्याने तब्बल पाच हजार शंभर कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा विक्रम केला आहे. सध्या राज्यासह धुळे तालुक्यातील त्रेचाळीस गावातील ग्रामस्थांनी या अभियानात सहभाग नोंदवीला होता. त्रेचाळीस गावातून अठरा गावांना पंधरा मार्कस मिळाली. स्पर्धेतील गावांना अकरा जेसीबी व वीस पोकलँडमार्फत पंच्याशीशे तास खोलीकरणाकरिता मदत झाली. शिंदखेडा तालुक्यात देखील तेहतीस गावांनी सहभाग घेतला अकरा मशिनद्वारे बेत्तीशेतास खोलीकरण करण्यात आले व पहिल्याच पावसात काही ठिकाणी पाणीच पाणी झाल्याची माहिती दुष्काळ मुक्त अभियानाचे व भारतीय जैन संघटनेचे धुळे तालुकाध्यक्ष सचिन कोठारी यांनी दिली.

गावकर्‍यांमुळे हे अभियान यशस्वी
भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा आणि पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. राज्यातील सोळाशे गावांमध्ये एकूण सोळाशे चोवीस यंत्राचा वापर करण्यात आला. ही स्पर्धा बावीस मे रोजी संपली आहे. त्यावेळी चारशेपेक्षा अधिक गावांना श्रमदान करून ही यंत्रेही मिळू शकली नाहीत. भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा यांनी यंत्रे पुरवून प्रोत्साहीत केले. जैन संघटनेने यंत्रे जरी पुरवीली असली तरी यात श्रमदान करणारे नागरिक, नागरिकांच्या गावाच्या पाठीशी असणारे शासन, स्थानिक जिल्हा प्रशासन व गावकर्‍यांमुळे हे अभियान यशस्वी होत आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले आहे. दरवर्षी हजारो टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. जनावरांकरिता चारा छावण्या निर्माण कराव्या लागल्या. अशा दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी जैन संघटना आणि पाणी फाऊंडेशन यांनी मिळून दुष्काळ मुक्त अभियान राबवले. कोठारी यांनी दिली.

74 गावांनी नोंदविला होता सहभाग
भारतीय संघटनेचे शांतीलाल मुथा यांनी माझ्यावर बीजीएसच्या धुळे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. मुथा यांच्या नेतृत्वाखाली मी वर्षातील 365 दिवस समाजाला समाजसेवा करण्यासाठी वेळ देणार असल्याचे श्री. कोठारी यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका व शिंदखेडा तालुका मिळून 74 गावांनी वाटरकप अभियानात सहभाग नोंदवला होता. या गावातील तलाव, नदी, नाले, बंधारा अगदी पहिल्याच पावसात भरगच्च भरले हे सर्व ग्रामस्थांची मेहनत आहे. आणि यामध्ये खरे योगदान शांतीलाल मुथा व आमिर खान यांचे आहे. हे दुष्काळमुक्त अभियान राबविण्यात आल्याने ग्रामस्थांनी सदर अभियानाचे कौतुक केले.