राज्यात पावसाची शक्यता; मराठवाड्यात उष्णतेची लाट

0

पुणे । 12 मेरोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहू शकते. 13 ते 15 मे या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 ते 13 मे या काळात विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

तसेच 12 ते 15 मेदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चद्रंपूर येथे 46.0 अं. से. नोंदवले गेले. पुण्यात तापमानाचा पारा 40.8 वर पोहोचला आहे.कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ तर मराठवाड्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली आहे.