राज्य गहाण ठेवण्याचा तुम्हाला काय अधिकार? सेनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

0

मुंबई – “पुढच्या पिढीस प्रेरणा देणारी छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारायलाच हवीत. त्यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी राज्य गहाण ठेवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेतून सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानांचा शिवसेनेने सामन्यातून समाचार घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखामधून मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

“राज्याचा सातबारा छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकरांच्या नावावर आहे. त्यांचे राज्य तुम्ही गहाण कसे टाकणार? मुख्यमंत्री येतात व जातात. सरकारे बदलत असतात, पण राज्य कायम राहते. त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा कुणी करीत असेल तर ते योग्य नाही.” असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.