धुळे । महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना धुळे व नंदुरबार विभागातर्फे विभागीय कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 21 मार्च रोजी सकाळी 11 वा. धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यात सन 2012 ते 2016 या कालावधीमधील निवृत्त कर्मचार्यांना वाढीव उपदान देण्यात यावे, निवृत्त कर्मचार्यांच्या पती-पत्नीस 500 किंवा जादा रक्कम भरून वार्षिक मोफत पास त्वरीत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच 1 जानेवारी 1996 च्या पत्रात नमूद केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, कर्मचार्यांच्या देय रक्कमा निवृत्तीच्या वेळीस तातडीने देण्यात यावे मागणी करण्यात आली.
विविध मागण्यांचा समावेश
महामंडळ कर्मचार्यांच्या पाल्यांना 5 टक्के नोकर भरतीमध्ये शासनाने पारीत केलेल्या ठरावानुसार त्वरीत मंजुरी देण्यात यावी, ईपीएस 95 पेंशन योजनेबाबत निवृत्तीनंतर तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत खात्यांतर्गत धोरण ठरविण्यात यावे, कर्मचार्यांच्या पाल्यांना त्वरीत नेमूणक देण्यात यावी, उपदानाच्या रक्कमेतून कपात करणे याबरोबर निवृत्त कर्मचार्यांच्या पाल्यांना तसेच रोजंदारी कर्मचार्ंयाना त्वरीत सेवेत समाविष्ट करावे आदी मागण्यांसाठी विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.