राज्य सरकारच्या कामगिरीवर निकाल अवलंबून-राजनाथ सिंह

0

नवी दिल्ली-आज देशातील पाच राज्यातील विधानसभेची मतमोजणी सुरु आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या तीन राज्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान यावर केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुका सत्ताधारी पक्ष राज्य सरकारच्या कामगिरीवर लढत असतो. त्यामुळे विजय, पराभवाला त्यांची कामगिरी जबाबदार असते अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचा विजय झाला तर मोदींचे यश आणि हरलो तर राज्यातील नेते जबाबदार असा मुद्दा समोर येतो आहे.