नवी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी गुणः दाखल करण्यात आले होते. २०१४ चे हे प्रकरण आहे. दरम्यान आज वाशी कोर्टात राज ठाकरेंच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली. यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच, याप्रकरणी पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असून या सुनावणीदरम्यान राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार नाहीत.