अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहेत.
अण्णा हजारेंची प्रकृती खालावत चालली आहे. लवकरच त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावे असे आवाहन सरकारला करण्यात येत आहे.