राज ठाकरे लागले विधानसभेच्या तयारीला

0

ठाणे: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आपल्या वेगळ्याच शैलीत प्रसिद्ध असलेले, ज्यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्याने राज्यात चर्चेला उधान आले होते, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आत्तापासून तयारीला लागले आहे. त्यांनी आज ठाण्यात मनसेचे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या सभेमधून मोदी-शहा मुक्त भारताची हाक दिली होती. आता विधानसभेच्या निवडणुकीत ते कशावर भाष्य करतात याकडे लक्ष लागून आहे. या विषयी त्यांनी आज कार्यकर्त्यांची सभा आयोजित केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या जिल्ह्यातील दुष्काळाबाबत माहिती आणण्याचे आदेश दिले आहे.

होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कुठले मुद्दे प्रचारात घेतले पाहिजे, प्रचार कशापद्धतीने केला पाहिजे या बाबतीत ते मार्गदर्शन करणार असून संघटनात्मक पातळीवर नेतृत्व बदला बाबत चर्चा करणार आहे.