राठोड यांना एशियाज ग्रेटेस्ट लीडर पुरस्कार

0

पिंपरी : एशियन बिझनेस फोरमच्या वतीने सिंगापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात थेरगाव येथील नॅशनल मोटीवेशनल गुरू भूपेंद्रसिंह राठोड यांना एशियाज ग्रेटेस्ट लीडर वॉर्ड 2017 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगभरातील नामांकित व्यक्तींच्या उपस्थितीत हा पुरस्कार अ‍ॅम्बेसेडर ऑफ युक्रेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राठोड यांनी मर्सिडीज बेंज, टाटा ग्रुप, वोडाफोन, डीएचएल, कोका कोला यांच्यासह अनेक नामांकित कंपनीचे संचालक, सीइओ, व्यवस्थापक यांच्यासह कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. राजस्थान मधील एका सामान्य कुटुंबातील एका खेडेगावातून पुण्यात आल्यावर राठोड यांनी अपार कष्ट व संघर्ष करीत इंग्रजीचे ज्ञान संपादन केले. सध्या ते मोटिवेशनल गुरु, बिजनेस कोच आणि लेखक म्हणून ते सर्व परिचित आहे.