राणे, केतकरांनी घेतली खासदारकीची शपथ

0

नवी दिल्ली : 16 राज्यातून एकूण 58 नवे खासदार राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. या सर्वांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई यांनी मराठीत खासदारकीची शपथ घेतली. तर प्रकाश जावडेकर, नारायण राणे यांनी हिंदीतून तर कुमार केतकर यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली.