नांद्रा । येथून जवळच असलेल्या कुरंगी येथील चिंतामण तुकाराम कुंभार (वय-65)यांच्या वर शेतात सकाळी 9 वाजेच्या सुमारास तर येथील पंढरीनाथ गोविंदा पाटील यांचा मुलगा सागर (वय-22) हा कांदा पिकाला पाणी देत असतांना दुपारी 12 च्या सुमारास रानडुकराने हमला केला.पुढील उपचारासाठी दोन्ही ना जळगाव हलवण्यात आले आहे. वनविभागाचे अशोक ठोंबरे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.या भागात मादी जातीच्या या रानडुकराने पिल्लांना जन्म दिलेला असावा. या हल्यामुळे शेतकरी व मजुर वर्ग भयभीत झालेली आहेत. या पिसाळलेल्या रानडुकराचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.