नवी दिल्ली- स्वराज फौंडेशनचे संस्थापक सदस्य तसेच ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत केंद्र सरकार राकेश अस्थाना यांना चौकशीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करताना राफेल प्रकरणात चौकशी नको म्हणून सीबीआयवर कारवाई करण्यात आल्याचाही गंभीर आरोप केला आहे.
Those asking: 'What's the Corruption in Rafale deal?' should read our complaint to CBI to see how Modi replaced the almost done deal of 126 jets at ~700Cr each to 36 at >1600 each only to give 35% Commission to Ambani's Co.That's corruption u/s 7 of PC Act https://t.co/6kC33gcsTm
— Prashant Bhushan (@pbhushan1) October 15, 2018
तसेच ते आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. आलोक वर्मा यांना पदावरुन हटवणे बेकायदेशीर असून विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यासोबत असणाऱ्या वादामुळे त्यांना हटवण्यात आल्याचा आरोप केला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मा यांची याचिका दाखल करुन घेतली असून 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
एम नागेश्वर राव यांच्याविरोधात अनेक आरोप असून आलोक वर्मा यांनीही त्यांना घेऊ नका अशी शिफारस केली होती. एम नागेश्वर राव यांनी भ्रष्टाचाऱ्यांना वाचवल्याचा आरोप आहे. आम्हाला वाटतं राफेल प्रकरणात चौकशी नको, म्हणून सीबीआयवर कारवाई करण्यात आली आहे असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे.