नवी दिल्ली- देशात सध्या राफेल प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. विरोधी पक्षांकडून सरकारवर आरोप केले जात आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावरून लक्ष केले जात आहे. राफेल करारासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारला १० दिवसांची मुदत दिली आहे. केंद्र सरकारने १० दिवसांत राफेल करारातील धोरणात्मक प्रक्रिया आणि किंमतीसंदर्भातील तपाशील सादर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.