राफेलबाबत पुरावे द्या अन्यथा राजीनामा द्या-राहुल गांधी

0

नवी दिल्ली-जेव्हा एखादी खोटी गोष्ट लपविण्यासाठी वारंवार खोटे बोलावे लागते, तसेच राफेलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारमधील मंत्री वारंवार खोटे बोलत आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राफेलवरून ते दररोज सरकारवर निशाना साधत आहे. दररोज नवनवीन आरोप राहुल गांधी करत आहे. दरम्यान आज देखील त्यांनी ट्वीटकरत एक खोट लपविण्यासाठी मोदी सरकार वारंवार खोटे बोलत असल्याचे आरोप केले आहे.

उद्या सरकारने संसदेत राफेल खरेदीबाबत माहिती, पुरावे द्यायला हवे अशी मागणी त्यांनी केली आहे. जर पुरावे देत नसतील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.