राफेलवरून लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जातोय-कन्हैया कुमार

0

औरंगाबाद- ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन(एआईएसएफ) उपाध्यक्ष जेएनयूचे विद्यार्थी कन्हैया कुमार यांनी राफेल घोटाळ्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात असल्याचे आरोप केले आहे.

‘संविधान बचाओ, देश बचाओ’ रॅलीला संबोधित करतांना ते बोलत होते. एनडीए सरकार भगवान रामाचे भक्त नसून नथूराम गोडसेंचे अनुयायी असल्याचे आरोप कन्हैया कुमार यांनी केले आहे.

त्याने आरएसएसवर निशाना साधत १२५ वर्षात आरएसएसने राम मंदिराचा मुद्दा सोडविला नाही. बाबरी मस्जिद पडल्यानंतर देखील राम मंदिराची निर्मिती करण्यात आली नाही. याचा अर्थ या सरकारला फक्त मतांचे राजकारण करायचे आहे असे आरोप केले.