राफेलवर चर्चा सुरु असतांना लोकसभेत कॉंग्रेस खासदाराने उडविली कागदाची विमान

0

नवी दिल्लीः राफेल करारावर लोकसभेत जोरदार गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उत्तर देत असताना काँग्रेसच्या काही खासदारांनी सभागृहात कागदी विमाने उडवली. हा पोरखेळ पाहून सभापती सुमित्रा महाजन चांगल्याच चिडल्या आणि त्यांनी खासदारांना खडे बोल सुनावले.

लहानपणी शाळेत असताना विमाने उडवली नाहीत का?, हा असा बालिशपणा ताबडतोब थांबवा, अशी तंबी सभापतींनी काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव आणि राजीव सातव यांना दिली. त्यानंतर सभागृहातील गोंधळ अधिकच वाढल्यानं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले.