नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात मत मागत फिरत आहे, मात्र यावेळी ते विकासाच्या मुद्द्यावर मत मागत नाही. त्यांच्या भाषणात विकासाबाबत कोठेही उल्लेख नसतो. मोदींनी काम केले असेल तर त्याच्या आधारावर त्यांनी मत मागावे. परंतु मोदी फक्त गांधी, नेहरू घराण्यावर टीका करतात. स्वत:ला ५६ इंचाचे म्हणवणाऱ्या मोदींनी एकदा तरी राफेलचा भ्रष्ट्राचार, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करावी मात्र या मुद्द्यावरून मोदी पळ काढत आहेत असे आरोप कॉंग्रेसने केले आहे. कॉंग्रेसने ट्वीटरवरून व्यंग्यचित्र प्रसिद्ध केले आहे, यातून त्यांनी मोदींना लक्ष केले आहे.
हे देखील वाचा