राफेल करार: अटॉर्नी जनरल यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव

0

नवी दिल्ली: राफेल विमान कराराचा मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील थांबण्याचा नाव घेत नसल्याचे चित्र आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे, तर विरोधकांची अवस्था तोंडघसी पडल्यागत झाली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात टायपिंग एरर दूर करण्यासाठी हलफनामा दाखल करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाना साधला आहे. विरोधक अटॉर्नी जनरल विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल करणार आहे. आरजेडीचे खासदार मनोज झा अटॉर्नी जनरल यांच्या विरोधात राज्यसभेत विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणणार आहे.