लोणावळा : रामनगर प्रभागातील सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला. मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गरसेवक बाळासाहेब जाधव, मंदा सोनवणे, जयश्री आहेर, मावळचे सभापती गुलाब म्हाळसकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अनिल गायकवाड, मावळ तालुका विज वितरण समितीचे सदस्य सुनील तावरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोणावळा नगरपरिषदेचा अविभाज्य भाग असून देखील रामनगरचा परिसर हा विविध सुविधांपासून वंचित राहिला आहे भविष्यकाळात येथील रस्ते, पाणी, वीज या समस्या सोडवण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले.