रामलीला मैदानाला वाजपेयींचे नाव?

0

नवी दिल्ली-दिल्लीतील रामलीला मैदानाला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. उत्तर दिल्ली महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून ३० ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे. महापौर आदेश गुप्ता यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी या मैदानावर सभा घेतलेल्या असल्याने या मैदानाला त्यांचे नाव देण्याबाबत विचार केला जात असल्याचे सांगितले.

दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेले मैदान म्हणजे रामलीला मैदान. ब्रिटिशांच्या काळात रामलीला मैदान हा एक मोठा तलाव होता. मात्र, यानंतर तलावात भर टाकून मैदान तयार करण्यात आले. या मैदानात दरवर्षी रामलीलेचे आयोजन केले जाते, त्यामुळे मैदानाला रामलीला मैदान असे नाव पडले