जळगाव। रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या शेजारीच असलेल्या टपरीतील कपड्यांनी लाँन्ड्रीला रविवारी पहाटे 4.30 वाजता अचानक आग लागली. यात लाँन्ड्रीमधील कपडे व टपरी जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांना आगीची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला संपर्क साधल्यानंतर काही मिनिटात बंब घटनास्थळी दाखल होवून आग विझविली.
लाँन्ड्रीतील कपडे जळून धूर निघाल्याचे समजले
रामानंदनगरातील रामानंदगनर पोलिस ठाण्याच्या शंभर मिटरच्या अंतरावर दिपक पवार यांची एका छोट्याश्या टपरीत कपडे इस्त्रीची लाँन्ड्री करण्याचे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री नेहमीप्रमाणे लाँन्ड्री बंद करून पवार हे घरी निघून गेले. मात्र, रविवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या लाँन्ड्रीला आतून आग लागलेली असल्याने आतून काही वेळातच लाँन्ड्रीतील कपडे जळून धूर बाहेर निघू लागल्याने बाजूलाच असलेल्या पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच अग्निशमन दलाला आगीचबाबत माहिती दिल्यानंतर काही मिनीटातच पाण्याचे बंब घटनास्थळी पाचारण झाले आणि कर्मचार्यांनी टपरीवर पाण्याचा मारा करीत आग विझविली. परंतू या आगीत लाँन्ड्रीत ग्राहाकांची संपूर्ण कपडे जळून खाक झाली होती तर टपरी देखील आतून संपूर्ण जळाली होती. आगीची माहिती मिळताच दिपक पवार यांनी देखील घटनास्थळ गाठले होते.