रामानंद नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सतीश डोलारे यांचे निधन

जळगाव : जळगावातील रामानंद नगर पोलिस ठाण्याचे हवालदार सतीश अरुण डोलारे (47) यांचे बुधवार, 12 रोजी 4.15 वाजेपूर्वी कावीळ आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने पोलिस दलातून हळहळ व्यक्त करण्यात आली. डोलारे यांनी यापूर्वी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागातही उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा यश (19) असा परीवार आहे.