जळगाव- मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीमधील सिद्धार्थनगरातील बांधाजवळ तलवार घेऊन दहशत पसर विणार्यास पोलिसांनी रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास अटक केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
सिद्धार्थनगरात एक तरुण तलवार घेऊन दहशत पसरवित असल्याची खबर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांनी या प्रकाराबाबत मेहरुण परिसरातील गस्तीवरील सहकार्यांना कारवाईचे आदेश दिले. पो लिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी त्याच परिसरातील लखन समाधान सपकाळे (वय 26) हा तरुण तलवार घेऊन दहशत पसरवित होता. तर त्याच्या सोबतचा एक जण देखील शिवीगाळ करीत होता. पो लिसांनी तलवार घेऊन फिरणार्या लखन समाधान सपकाळे यास पकडले. त्याच्याजवळील तलवार पोलिसांनी जप्त केली. तसेच त्याच्या सोबतचा तरुण पसार झाला. याबाबत कॉन्स्टेबल मुकेश अनिल पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कामगिरी उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, कॉन्स्टेबल किशोर पाटील, स चिन पाटील यांनी केली. तपास नाईक इमरान सय्यद करीत आहेत.
Prev Post