लखनौ-सध्या देशभरातून अयोध्येत राम मंदिर कधी उभारणार याबाबत सरकारला विचारणा होत आहे. संपूर्ण देशात राम मंदिराचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते माजी मंत्री डॉ. सीपी जोशी यांनी भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचे आरोप केले आहे. भाजपला निवडणूक आली की राम मंदिराचा मुद्दा आठवतो. भाजप राम मंदिराची उभारणी करणार नाही, कॉंग्रेसच राम मंदिर बनविणार असे डॉ.सीपी जोशी यांनी सांगितले आहे.
१९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी विवादित परिसरावरील बंदी उठवली होती. त्याच धर्तीवर कॉंग्रेसच राम मंदिर उभारणार असा विश्वास डॉ.सीपी जोशी यांनी व्यक्त केला आहे.