नवी दिल्ली- अयोध्यामध्ये राम मंदिराची निर्मिती व्हावे या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद दिल्लीतील रामलीला मैदानवर धर्म सभा घेणार आहे. ११ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राम मंदिराबाबत कायदा व्हावा अशी मागणी विहिपने केली आहे. यासाठीच विहिप रॅली काढणार आहे. सकाळी ११ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत धर्म सभा चालणार आहे.
धर्म सभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे कार्यकारी प्रमुख सुरेश भैय्याजी जोशी संबोधित करणार आहे. धर्म सभा होणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्थाकरण्यात आली आहे.