सोलापूर-राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येते. अयोध्यामध्ये महासभा घेतल्यानंतर आज शिवसेना पंढरपूरमध्ये महासभा घेणार आहे. या महासभेला ५ लाख शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
अयोध्येत राम मंदिर व्हावे या मुख्य मागणीसाठी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत सरयू नदीकाठी जाऊन सभा घेतली होती. शिवसेनेने राम मंदिरासाठी अध्यादेश काढावे अशी मागणी केली आहे.