राम मंदिर नाही तर सरकार नाही-उद्धव ठाकरे

0

अयोध्या-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबिय आणि कार्यकर्त्यांसह अयोध्येला गेले आहे. आज त्यांचा अयोध्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सध्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येत राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे सहपरिवार दर्शन घेतले.