अलिबाग : सायबर क्राईमचे लोण रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरु लागले आहेत. इंटरनेटची सहज उपलब्धता आणि मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईमचे गुन्हे ग्रमीण भागातही दाखल होऊ लागले आहेत. 2017 मधील पहिल्या सहा महिन्यात जून अखेरपर्यंत जिल्ह्यात सायबर क्राईमशी निगडीत 17 गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यामधील 11 गुन्हे हे बँकींग क्षेत्राविषयी आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये आधुनिकतेचा वापर वाढल्यामुळे या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. आपल्याला कंपनीकडून एक कोटीचे बक्षीस लागले आहे. त्यासाठी तुम्हाला काही टक्के म्हणजे दोन किंवा चार लाख रुपये भरावे लागतील, असे एसएमएस येतात. पैशाच्या हव्यासापोटी काहींनी रक्कम भरल्यानंतर फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
राज्यभरात अनेक ठिकाणी बँक खात्यातील पैसे गायप झाल्याच्या अनेक बातन्या प्रसारीत होवूनही लोक अद्याप येनार्याप फोन कॉल्सवर आपल्या बँक खात्यची माहीती देत असल्याने असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर सध्या मोबाईलच्या अवास्तव वापरामुळे तसेच सोशल मीडियावरील आक्षेपाहार्य मजकुरांमुळे या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी राज्यात सायबर क्राईम सेल मार्फत प्रयत्न सूरू असून त्यावर आळा घालण्यासठी जनजागृती करण्यात येत आहे.
बँकांच्या नावाने होतेय फसवणूक
काहीवेळा आपण बँकेचे मॅनेजर बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डाची मुदत संपली आहे, जुने कार्ड रद्द करुन तुम्हाला नवीन कार्ड दिले जाणार आहे. तुमचा सांकेतिक क्रमांक द्या, असे सांगून त्याद्वारे अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले जातात. अशा प्रकारचे 2017 मध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त फेसबुक, वॉट्स् अॅयपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणे, बदनामी करणे, अफवा पसरविणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. एटीएम मधील रकमांवर डल्ला मारणार्याव टोळ्या बाहेरील राज्यातून आपल्या कारवाया करित असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. पोलीसांनी त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.