रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने काळे आर्म बँड का बांधले?

0

पुणे। आयपीएल 2017 मंगळवारी येथे पुणे येथे दिल्ली डेयरडेविल्स व रायझिंग पुणे सुपरजायंट याच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात डिडि संघाने 97 धावानी पुणे संघावर विजय नोदविला.या सामन्यात आरपीएस संघाने आपल्या हातावर काळ्या पट्टया बांधल्या होत्या.संपुर्ण सामना संपे पर्यंत प्रत्येक खेळाडूच्या हातावर या पट्ट्या दिसत होत्या.यामागील कारण होते.आरपीएल संघाचा खेळाडू मनोज तिवारी यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याच्या दु:खात सहभागी असल्याचे प्रतिक म्हणून काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.

पुणे संघात आजी माजी कर्णधारांचा सहभाग
आरपीएस या संघात अनेक खेळाडू असे आहे की ते आप-आपल्या राष्ट्रीय संघात कर्णधार आहे किवा राहिले आहे. या संघात स्टीव स्मिथ, फाफ डू प्लेसी, महेंद्र सिंह धोनी,अजिक्य राहणे या सारखे महान खेळाडू आहे. याचा संघात सहभाग असल्याने आरपीएस संघ मोठा मजबूत संघ बनतो.मंगळवारी झालेल्या सामन्यात आरपीएसचा कर्णधार स्टीव स्मित अनफिट झाल्याने तो खेळू शकला नाही. त्याच्या उनपस्थितीत संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी अजिक्य राहणे याने सांभाळली. दिल्ली डेयरडेविल्स संघा विरूध्द सामना खेळतांना रायझिंग पुणे सुपरजायंटच्या संघातील प्रत्येक खेळाडूने आप – आपल्या हातावर काळी पट्टी ( आर्म-बँड ) बांधले होते. ज्याचे कारण होते की, आरपीएस संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनोज तिवारी यांच्या वडिलांचे निधन झाले होते.ज्यामुळे मनोज तिवारी तो सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी आरपीएस संघात राहुल त्रिपाठी याला स्थान मिळाले.

पुढील सामान्यावर लक्ष
आरपीएसने आधिकारिक ट्विटर माध्यमातून माहिती दिली की, मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली डेयरडेविल्स संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.डिडिचा फलंदाज संजू सैमसन ने शतकी खेळी केली.त्याच्या क्रिकेट कॅरीयरमधील पहिले शतक होते. त्याने 63 चेंडून 102 धावा केल्या. ज्यात 8 चौकार व 5 षटकार लावले.त्याला या खेळीमुळे सामनावीराचा पुरस्कार मिळाला. डिडिने हा सामना सहज जिकला. हा पराभव विसरून पुढील सामना जिकण्यासाठी आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे.