रायसोनी इन्स्टिट्यूटचे हॅंडबॉल स्पर्धेत यश

0

जळगाव : येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नुकत्याच पार पडलेल्या हॅंडबॉल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत अभियांत्रिकी महाविद्यालयाने हॅंडबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. संघात विशेष कामगिरी केल्यामुळे अजिंक्य वडनेरे, शुभम जैन, आकाश पाटील यांची हॅंडबॉल स्पर्धेत विभागीय संघात निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या धनाजी नाना महाविद्यालयात या स्पर्धा संपन्न झाल्यात. स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, अभियांत्रिकीचे प्राचार्य, उपप्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक प्रा.संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.