रावल बँक गैरव्यवहार प्रकरणी तिघे फरार घोषित

0

दोंडाईचा। दोंडाईचा येथील रावल बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित तिघांना फरार घोषित करण्यासाठी सीआयडीने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर न्यायालयाने त्यांचा फरार जाहीरनामा काढला आहे. त्यानुसार त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी वारंवार बोलावूनही उपस्थित न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील रावल बँकेत सुमारे 16 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार होती. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील संशयित मोहनलाल नरसुलाल पटवारी, जयदेवसिंग जयसिंग रावल, कोमलसिंग पौलादसिंग गिरासे या तिघा संचालकांना सीआयडीने वेळोवेळी चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र, ते उपस्थित राहीले नाहीत. त्यांचा सीआयडीने शोध घेतला. परंतु, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे अखेर सीआयडीने धुळे न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानुसार न्या.आर. आर. कदम यांनी सीआरपीसी 82 अन्वये या तिघांच्या नावे फरार जाहीरनामा काढला आहे.