रावसाहेब दानवेंची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी

0

मुंबई  । सरकारने चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा मला द्या मी त्या बदलून नव्या नोटा देतो असे जाहीरपणे सांगणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना तात्काळ अटक करून त्याची अंमलबजावणी संचालनालया (ईडी) मार्फत चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत म्हणाले की, राज्यभरात नोटा बदलून देणार्‍या टोळीचा सूत्रधार कोण आहे? हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुलडाणा येथे जाहीर सभेत सांगितले आहे. त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन सरकारने त्यांना तात्काळ अटक करून दानवे आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या गेल्या सहा महिन्यातील सर्व व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी करावी, ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे.