रावेत : नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या एका वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास रावेत बंधारा येथे घडली. वृद्धाची ओळख अद्याप पटली नसून त्याचे वय अंदाजे 55 वर्ष आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झालेला वृद्ध रावेत येथे पवना नदीमध्ये पोहण्यासाठी गेला. कपडे काढून नदीपात्रामध्ये उतरले असता अचानक ते बुडाले. नदीच्या प्रवाहात ते वाहून धरणाच्या बंधार्यात अडकले. स्थानिक नागरिक बंधार्यावर गेले असता एकजण बुडाला असल्याचे दिसले. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला दिली, त्यावरून रहाटणी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फायरमन संतोष सरोटे, मिलिंद पाटील, भूषण येवले, वाहन चालक राजाराम लांडगे यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला.