रावेरच्या बेपत्ता तरुणाचा खिर्डीनजीक मृतदेह आढळल्याने खळबळ

0

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण होणार स्पष्ट

खिर्डी – रावेर शहरातील बंडू चौकातील रहिवासी असलेल्या व गुरुवारपासून बेपत्ता झालेल्या इम्रान शेख लुकमा (26) या युवकाचा खिर्डी गावाजवळील विवरा रस्त्यावरील बाळू पाटील यांच्या शेतात संशयास्पद अवस्थेत शुक्रवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या युवकाचा घातपाताने मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली? याबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. निंभोरा पोलिसांना या घटनेची माहिती कळताच शुक्रवारी उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे व कर्मचार्‍यानी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निंभोरा पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.