गटविकास अधिकार्यांची चर्चा निष्फळ : उपोषणार्थी मागण्यांवर ठाम
रावेर- विविध मागण्यांसाठी कुसंबा खुर्द येथील भालेराव कुटुंबाने गुरुवारपासून पंचायत समितीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. घरकुल, ग्रामसेवक तक्रार, ड चा उतारा यांच्या इतर मागण्यांसाठी सुनील भालेराव, सविता भालेराव, निशा भालेराव,उत्कर्षा भालेराव आदींनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाला बसलेल्या 13 वर्षीय उत्कर्षा भालेराव या चिमुकलीची प्रकृती बिघडल्याने तिल रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. शुक्रवारी गटविकास अधिकारी हबीब तडवी, सी.आर.महाले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावी, अशी विनंती केली मात्र उपोषणार्थी मागण्यांवर ठाम आहेत. दोषींवर कारवाई करावी या मागणीवर भालेराव कुटुंब ठाम आहेत.