रावेरच्या सौभाग्यनगरात झाली धाडसी घरफोडी

0

रावेर । शहरातील सौभाग्य नगरात अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास घरात कुणीही नसताना घरफोडी करुन सुमारे 1 लाख 34 हजाराचा ऐवज लंपास केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दागिण्यांवर मारला डल्ला
सौभाग्य नगरातील रहिवासी असलेल्या कल्पना गुणवंत चौधरी (वय 32) या निंभोरा येथे कामानिमित्त गेल्या होत्या ही संधी साधुन गुरुवार 18 रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. व कपाटातील 2 तोळे सोन्याची मंगलपोत, 7 ग्रॅम वजनाची टोंगल, 8 ग्रॅमच्या साखळ्या, साडे चार ग्रॅमच्या कानाच्या रिंगा असे एकूण 43 ग्रॅम सोने, 7 हजार रोख, 9 हजार रुपये किंमतीचा टीव्ही असा एकूण 1 लाख 34 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत कल्पना चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास पोलिस निरीक्षण धनंजय येळुळे यांच्या मार्गदशनाखाली फौजदार दीपक ढोमने व सहकारी करीत आहे.