रावेर : शहरातील एका 35 वर्षीय युवकाचा संशयीतरीत्या मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. या तरुणाला उपचारासाठी येथील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत असलेल्या कोविड केअर सेंटरवर दुपारी साडेचार वाजता दाखल करण्यात आले मात्र दाखल होण्यापूर्वीच या युवकाचा मृत्यू झालेला असल्याची माहिती कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी दिली.
संशयीत मयताचा स्वॅब घेतला
दरम्यान, आरोग्य विभागाने खबरदारी घेत संशयीत रुग्ण म्हणून या मयत युवकाचा स्वॅब घेतला आहे तर वैद्यकीय प्रक्रियेनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील निंभोरासीम येथील येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून या व्यक्तीच्या संपर्कातील 61 जणांना यापूर्वीच विलगीकरणासाठी कोविड केअर सेंटरवर ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.