रावेरनजीक दुचाकी-ट्रकमध्ये अपघात : एक जण गंभीर

रावेर : रावेर शहरातील व्ही.एस.नाईक कॉलेजजवळ दुचाकी व ट्रकची समोरा-समोर धडक झाल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास घडला.

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
रावेर शहरातील व्ही.एस.नाईक कॉलेजजवळ मध्यप्रदेशकडून ट्रक (नंबर एम.एच.06 एच.सी.1605) रावेरमार्गे जळगावच्या दिशेने बटाटे घेऊन जात असतानाच रावेरकडून एम.एच.19 डी.आर. 8335 या मोटरसायकलने गोविंदा देविदास महाजन अटवाडेच्या दिशेने निघाले असतानाच दोन्ही वाहनांमध्ये धडक झाल्याने गोविंदा महाजन याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रकचालक रावेर पोलिस स्टेशनला जमा झाला आहे. जखमी मोटरसायकलस्वाराला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.