रावेरमध्ये मांस वाहतूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

रावेर- गुरांचे मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून रावेर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे 250 ते 300 किलो मांस बुधवार जप्त केले. तीन लाख रुपये किंमतीची पिकअप महिंद्रा बोलेरोही जप्त् करण्यात आली आहे. रावेर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलिस राजेंद्र करोडपती यांना मिळालेल्या गुप्ता माहितीवरून रावेर शहरातील रसलपूर रोडवरील इमामवाडा परीसरात ही कारवाई करण्यात आली.

वाहनासह आरोपी जाळ्यात
पीकअप (एम.एच.04 ई.वाय. 2535) या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात गुरांचे मांस आढळले. या प्रकरणी शेख एजाज शेख अफजल (28), शेख शरीफ खलील (37) व शेख आरीफ शेख खलील (39, सर्व रा. इमामवाडा, रावेर) या तिघांविरुद्ध राजेाद्र करोडपती यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नाजीम शेख करीत आहे.