रावेर- शहरातील छोरिया मार्केटमध्ये एका संगणकाच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
रावेर शहरातील छोरिया मार्केटमध्ये असलेले दत्ता कम्प्युटर या दुकानात बॅटरी ओव्हर चार्ज होऊन शॉर्टसर्किट झाला आणि मोठा स्पोठ झाल. दुकानात मोठी आग लागली याची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. ताबडतोब रावेर नगरपालिकेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचली. आग नियंत्रणात आणली, त्यानंतर शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.