रावेरला एकाची रेल्वेखाली आत्महत्या

0

रावेर- शहरातील बर्‍हाणपूर रोडवरील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील रहिवासी रवींद्र रमेशचंद्र अग्रवाल (गाथोडिया, 49) यांनी शुकवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास रावेर मालधक्याजवळ धावत्या मालगाडीखाली उडी घेवून आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. श्रीराम पेट्रोल पंपाचे संचालक तथा नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांचे मयत रवींद्र हे शालक होते. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता रावेर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मालधक्क्यावर त्यांनी दुचाकी लावून धावत्या मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. याबाबत उपस्टेशन अधीक्षक किशोर सोनवणे यांच्या खबरीवरून भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास शिवलाल दहीकर व विकास चाटकर करत आहे. मयत रवींद्र अग्रवाल हे गेल्या अनेक वर्षापासून शहरात त्यांचे मेहुणे प्रकाश अग्रवाल याचे कामकाज सांभाळत होत. मात्र त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली हे मात्र कळू शकले नाही.