रावेरला दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मंडळांचा जल्लोष

0

रावेर- शहरात मोठ्या भक्तीमय वातावरणात शुक्रवारी सायांकळी दुर्गा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात लेझीम मंडळे, दुर्गा उत्सव मंडळे त्यात सहभागी झाली. ढोल-ताश्यांच्या गजरात व लेझीम पथकाच्या तालावर मिरवणूक निघाली असून पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

या मंडळांचा सहभाग
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत सिद्धीविनायक व्यायाम शाळा, त्रिमूर्ती दुर्गा उत्सव समिती, प्रताप व्यायाम शाळा, पवन व्यायाम शाळा, अफूगल्ली दुर्गा उत्सव मंडळ, अंबिका व्यायाम शाळा, आठवडेे बाजार मंडळ, शिवराणा दुर्गा उत्सव मंडळ, साई शिवाजी व्यायाम, शिवाज्ञा व्यायाम शाळा, शिवाजी व्यायाम शाळा, नागवेल लेझीम मंडळ, भगतसिंग व्यायाम शाळा, सत्यशोधक महात्मा फुले व्यायाम शाळा, हनुमान व्यायाम शाळा, महात्मा फुले व्यायाम शाळा, पवन व्यायाम शाळा, सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती यांच्यासह मोठ्या संख्येने दुर्गोत्सव मंडळे सहभागी झाली आहेत.

लोकप्रतिनिधींनी दिल्या मंडळांना भेटी
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रत्येक मंडळाला भेट दिली. मिरवणुकीदरम्यान तहसीलदार विजयकुमार ढगे, माऊली फाउंडेशन अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी, नगरसेवक जगदीश घेटे, राजेंद्र महाजन, पद्माकर महाजन, मुन्ना अग्रवाल, रवींद्र महाजन, अय्यूब खा, असदउल्ला खा, सादीक शेख, अनिल अग्रवाल, सुधाकर महाजन, मनोज श्रावक, पप्पू गिनोत्रा, भूषण महाजन, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, यशवंत दलाल, भास्कर महाजन शिरीष वाणी,अमोल पाटील,भास्कर पहेलवान, सुधाकर नाईक, अशोक शिंदे, डी.डी.वाणी, काझी साहेब, दीपक नगरे, शेख गयास, सुनील महाजन, डी.एन.वाणी, वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता योगेश पाटील यांच्यासह मोठ्या संखेने मोठ्या संखेने भक्तगण सहभागी झाले. मिरवणुकीसाठी मुस्लिम पंच कमेटी, शांतता समिती सदस्य परीश्रम घेत आहेत. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाडळे, फौजदार मनोहर जाधव यांच्यासह चार पोलिस अधिकारी, 50 होमगार्ड एसआरपी तुकडी असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.