‘रेशीमबंध’पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ; हुंडा प्रथा बंद करून नियोजनपद्ध पद्धत्तीने विवाह करावेत ः उपप्रादेशिक परीवहन अधिकारी जयंत पाटील
रावेर- हुंड्याची प्रथा बंद करून साखरपुडा, लग्न यात वारेमाप खर्च न करता मोजक्या पाहुण्यांना बोलवून व्यवस्थित नियोजनबद्ध विवाह करावेत, मुलगी बघण्याची प्रथा बंद करून दोघे कुटुंबांनी एकाच वेळी भेटून निर्णय घ्यावा यामुळे मुलीचा स्वाभिमान राखला जाईल व स्त्री-पुरुष समानतेला चालना दिली जाईल, असे विचार उपविभागीय परीवहन अधिकारी जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले. शहरातील मराठा समाज मंगल कार्यालयात रविवारी रावेर तालुका मराठा समाजातर्फे वधू-वर परीचय मेळावा झाला. याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी मराठा समाजातील 145 मुलींनी तर 155 मुलांनी आपला परिचय करून दिला. वधू-वर परीचय ‘रेशीमबंध’पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सौंदर्याऐवजी कर्तृत्वावर भर द्यावा -प्रा.बच्छाव
लग्नांमध्ये भात देणे, आहेर देणे, अहेर स्वीकारणे, फुकटचा आव आणून पैशांचा तमाशा करणे अशा पारंपरीक व खर्चिक प्रथा मोडून काढा, असे आवाहन प्रा.डी.डी.बच्छाव यांनी केले. वेळ व पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी सामुहिक विवाह आवश्यक आहे. व्यक्तीचे सौंदर्य हे त्याच्या कर्तुत्वात असते म्हणून सौंदर्यावर भर न देता कर्तुत्वावर भर द्यावा. विवाह जोडतांना आर्थिक निकष आणू नका. विचार सुधारा तेंव्हा दृष्टीकोन बदलेल. नोकरदारांसह व्यावसायीक वरही पसंत करावा तसेच निव्वळ भाऊ नसल्याने किंवा कुंडली न जुळल्याने वधू नाकारणे हे चुकीचे आहे, असेही प्रा.बच्छाव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरुण पाटील, सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संचालक प्रा.डी.डी.बच्छाव, उद्योजक श्रीराम पाटील, दर्जी फाउंडेशनचे प्रा.गोपाल दर्जी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष यु.डी.पाटील, जिल्हा परीषद सदस्य रंजना प्रल्हाद पाटील, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, तहसीलदार विजयकुमार ढगे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष राम पवार, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी.आर.पाटील, शेतमाल प्रक्रिया संस्थेचे चेअरमन सोपान पाटील, बोदवड बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन डॉ.राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, उद्योजक जितेंद्र पवार, भुसावळ तालुका मराठा समाज विवाह समिती अध्यक्ष ज्ञानदेव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी दत्तात्रय पाटील, कार्याध्यक्ष घनःशाम पाटील, सचिव प्रशांत पाटील, सी.एच.पाटील, योगेश महाजन, विनोद पाटील, डॉ.सुरेश पाटील आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचलन पी.आर.पाटील व शेखर पाटील यांनी केले. तालुकाभरातुन मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मुले मुली व पालक उपस्थित होते.