रावेरला वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

0

रावेर- वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकक्षययांच्या शेत मालाला भाव नाही, इंधन दरवाढ यासह अन्य मागण्यांसाठी शनिवार, 20 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावर शेतक-यांच्या प्रश्नासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन होईल. तालुक्यातील बेरोजगारांसह शेतकर्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी यांनी केले आहे.