रावेरला शासकीय तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन

0
रावेर- नाफेड अंतर्गत शासकीय तूर खरेदी केंद्राचे शुभारंभ बुधवारी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कृषी उपन्न बाजार समितीच्या सभागृहात माजी आमदार अरुण पाटील यांनी काटा पूजन करून तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ केला. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी परीमल साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
कृषी उपन्न बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी, उपसभापती अरुण पाटील, संचालक योगेश पाटील, गोपाळ नेमाडे, विनोद पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जिजाबराव चौधरी, व्हा.चेअरमन लक्ष्मण मोपारी, निलेश चौधरी, पी.आर.पाटील, मंदार पाटील, राजन लासूरकर, गोपाळ महाजन, संघाचे मॅनेजर निलेश चौधरी, प्रशांत पाटील, वसंत कोळी, संतोष महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन तर आभार प्रदर्शन पी.आर.पाटील यांनी केले.