रावेरसह परीसरात दमदार पावसाची हजेरी

0

रावेर- रावेरसह परीसरात शनिवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी दिल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे रावेर शहरातील नागझिरी नदीला मोठा पूर आल्याने सुमारे एक तास वाहतूक बंद होती. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रावेर परीसरात वातावरणात अचानक बदल झाला व आभाळमय वातावरण निर्माण होवून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

पूराबाबत तहसीलदार अनभिज्ञ
रावेर शहराच्या भर वस्तीतून वाहणार्‍या नागझिरी नदीला मुसळधार पावसामुळे मोठा पूर येवून वाहतूक ठप्प झाली तर सावदा रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ धोक्याची पातळी ओलांडली गेली मात्र याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना विचारणा केली असता केवळ पाऊस आल्याचे त्यांनी सांगत आपल्या काहीही माहिती नसल्याचे अजब उत्तर दिले.