रावेर : शहरातील तडवी कॉलनी परीसरातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरात प्रवेश करत कपाटातील 67 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताक रसुल तडवी (55, तडवी कॉलनी) हे खाजगी नोकरीला आहेत. शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते 25 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घरातील सदस्य झोपले असताना चोरट्याने घरात प्रवेश करीत घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 67 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी मुस्ताक रसुल तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुरेश मेढे करीत आहेत.