रावेरातील दिड कोटींचे भ्रष्टाचार प्रकरण : पुन्हा दोन आरोपींना अटक

रावेर : राज्यात गाजत असलेल्या रावेर पंचायत समितीतील दिड कोटींच्या शौचालय गैरव्यवहार प्रकरणी रावेर पोलिसांनी नव्याने दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी रात्री खिरोदा प्र.रावेर येथून सतीश वामनराव पाटील तर खिरवड येथून महेंद्र बिसन गाढे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या दहावर पोहचली आहे. दरम्यान, यापूर्वी अटकेत असलेल्या आठ आरोपींसह नव्याने अटक केलेल्या दोघांना रावेर न्यायालयात हजर केले असता दहा आरोपींना 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अनेकांवर कारवाई होणार
बहुचर्चित रावेरातील शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात दिवसागणिक आरोपींची संख्या वाढत आहे. सोमवारी दिवसभर येथील गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांचा जबाब नोंदवण्यात आला तर सायंकाळी काही बँक अधिकार्‍यांचीदेखील चौकशी तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी केली. दरम्यान, अटकेतील एकूण दहा आरोपींना मंगळवारी रविवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.