रावेरातील लाचखोर फौजदाराला कोठडी

0

रावेर : मार्बलचा ट्रक सोडण्यासाठी दहा हजारांची लाच घेणार्‍या रावेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण एकनाथ निकाळजे यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी चार वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केली होती. शुक्रवारी निकाळजे यांना भुसावळच्या अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तक्रारदार यांचा ट्रक 5 रोजी रावेर शहरातील आंबेडकर चौकात निकाळजे यांनी थांबवून दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर यांच्याकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली होती.