रावेरातील वजनमापे निरीक्षक जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

32,000 bribe: Raver Weighing Inspector Caught in Jalgaon ACB’s net रावेर : रावेर शहरातील वजनमापे निरीक्षकांना 32 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या (Jalgaon ACB) पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुनील रा.खैरनार (रा.एमआयटी कॉलेजजवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एस.एस.सन्स पेट्रोल पंपावर हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, निरीक्षक एन.एन.जाधव व सहकार्‍यांनी यशस्वी केला.

असे आहे नेमके प्रकरण
रावेर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर तक्रारदाराचा एस.एस.सन्स पेट्रोल पंप असून त्यांनी तो 11 महिन्यांच्या कराराने चालवण्यास घेतला आहे. पंपावरील नोझल मशीन्स स्टॅपींग करून देण्यासह कुठलीही अडचण येवू न देण्यासाठी आरोपी तथा रावेर वजनमापे निरीक्षक सुनील खैरनार यांनी शासकीय फी व्यतिरीक्त 32 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. खैरनार हे मंगळवारी पंपावर लाच रक्कम घेण्यासाठी आल्यानंतर पंचांसमक्ष त्यांना अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वी केला.